Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर नवरात्रौत्सव नवरात्रीत उपवासाच्या हेल्दी टिप्स

नवरात्रीत उपवासाच्या हेल्दी टिप्स

उपवास करत असाल तर हेल्दी राहणं आणि हेल्दी खाणं खुप महत्त्वाचं आहे.

Related Story

- Advertisement -

नवरात्रीत उपवास करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. त्याचबरोबर उपवास करण्याचे काहि शारिरीक फायदे ही आहेत. असं म्हणतात कि नवरात्रीत उपवास केल्याने आपले शरिर आणि मन शुद्ध होते. त्याचबरोबर आपल्या शरिराला आराम मिळतो आणि आपली बॉडी डिटॉक्स होते. पण उपवास करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. या नवरात्रीत जर तुम्ही उपवास करत असाल तर हेल्दी राहण आणि हेल्दी खाणं खूप महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया नवरात्रीत हेल्दी उपवासाच्या काही हेल्दी टिप्स.

  1.  नवरात्रीतील उपवास बॉडी डिटॉक्स करण्यासाठीचा करण्याची योग्य संधी आहे. या वेळी आपल्या शरिरातील पाण्याचे प्रमाण योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून पिऊ शकता. यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स होते.
  2. सकाळी ब्रेकफास्टमध्ये ज्युसचा समावेश करा. लिंबू पाणी, चिकू ज्यूस, मिल्क शेक,बेदाणे याचा ब्रेकफास्टमध्ये समावेश करा. केळ आणि अक्रोडचं ज्यूस हा नवरात्रीच्या उपवसात स्पेशल ज्यूस म्हणून पितात. हायकोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर उपवासाच्या पदार्थात काजूचा समावेश करू नका.
  3. उपवास करत असाल तर चहा आणि कॉफीचे सेवन अजिबात करू नका. त्याऐवजी ग्री टी प्या.
  4. उपवासाच्या दिवसात तळलेले पदार्थ कमी खावेत. फायबर आणि प्रोटीन शरिरासाठी खुप महत्त्वाचे असतात. त्यासाठी रोज फळे खावीत. फळांच्या सेवनाने वजनही कमी होते. डाळींबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात.त्यामुळे उपवासाच्या वेळी डाळींबाचे सेवन कधीही फायदेशीर.
  5. नवरात्रीचे उपवास करताना बऱ्याचदा आपल्या शरिरातील ब्लड ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं त्यामुळे थकवा आल्यासारखं वाटतं यासाठी थोड्या थोड्या वेळाने उपवासाचे काही पदार्थ खात रहावे. जसे की साबुदाण्याची खिचडी, शेंगदाणे, फळे खात रहावी.
  6. उपवासाच्या काळात आपल्या शरिरातील पाण्याची पातळी योग्य ठेवणे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे उपवासाच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी प्या. शरिरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी नारळ पाणी, लिंबू पाणा प्या. त्याचबरोबर ग्री टी, छास पिणे हि उत्तम.
  7. उपसाच्या दिवसात शरिरातील एनर्जी टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेटची गरज असते. बटाटा, साबुदाण्याची खिचडी, टोमॅटो मधून आपल्याला मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेड मिळतात. शिंगाड्याच्या पिठाचे वडे किंवा थालीपिठही खाऊ शकता. उपवासाच्या पदार्थात दह्याचे सेवन आवर्जुन करा यातूनही जास्त कार्बोहायड्रेट मिळतात.
  8. रोज ३-४ बदाम आठवणीने खा. बदामाच्या सेवनामुळे शरिरात आयर्नची कमतरता भासणार नाही. काजू, बदाम, अक्रोड नवरात्रीच्या उपवासासाठी नेहमीच उत्तम. रात्री झोपण्याच्या आधी एक ग्लास दुध प्यावे.
  9. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवासाच्या दिवसात व्यायाम करायला विसरू नका. रोज हलका व्यायाम करा. सोप्पी योगासने करा. सकाळी प्राणायाम करा. यामुळे तुमचे मन शांत राहण्यास मोठी मदत होईल.

तुम्ही ही नवरात्रीत उपवास करत असाल तर या हेल्दी टिप्स नक्की लक्षात ठेवा.

- Advertisement -