Navratri 2020 : अशी करा घटस्थापना; होतील अपेक्षित लाभ!

नवरत्रौत्सवाला काही तासांमध्ये प्रारंभ होत आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी या वर्षीच्या घटस्थापनेचा मुहूर्त आहे. या दिवसापासून पुढील नऊ दिवस नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. हिंदू धर्मात हा काळ खुपच शुभ मानला जातो. अनेक महिला आपल्या घरामध्ये घटाची स्थापना करून मनोभावे पुजा करतात. देवीची विधीवत पुजा केल्याने भक्तांना चांगले फळ मिळते, अशी भावना आहे. मात्र ही पूज योग्य रितीने करणे अपेक्षित आहे. त्यामुळे घटस्थापना करताना ती कशी करावी, याबाबत माहिती आपण जाणून घेणार आहोत.

विधीवत घटस्थापना अशी करावी

 • अश्विन शुक्ल प्रतिपदेला ब्रह्म मुहुर्तात स्नान करावे.
 • घरातील कोणत्याही पवित्र जागेत स्वच्छता करून मातीने वेदी बनवावी.
 • वेदीत जव आणि गव्हाचे दाणे मिसळून पेरावे.
 • वेदीवर किंवा त्याचा जवळच्या पवित्र जमिनीची पूजा करावी आणि त्या ठिकाणी सोनं, चांदी, तांबा किंवा मातीचे घट स्थापित करावे.
 • यानंतर त्या कलशात किंवा घटात आंब्याचे पानं, दुर्वा आणि पंचामृत टाकून त्याच्या तोंडाला पवित्र सूत्र बांधावे.
 • कलश किंवा घट स्थापनेनंतर गणपतीची पूजा करावी.
 • यानंतर वेदीच्या बाजूने देवी आईची कोणतीही धातू, दगड, माती आणि तसवीरीची विधी-विधानाने स्थापना करावी.
 • मूर्तीचे आसन, पाद्य, अर्ध, आचमन, स्नान, कापड, गंध, अक्षत, फुले, धूप दिवा, नैवेद्य, आचमन, पुष्पांजली, नमस्कार आणि प्रार्थना करून पूजा करावी.
 • दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि दुर्गा स्तुती करावी.
 • पाठाचे वाचन केल्यावर दुर्गेची आरती करून प्रसाद वाटप करावा.
 • कन्यांना जेवण द्या. नंतर स्वतः फळे खावी.
 • नऊ दिवस हे घट बसवले जातात.
 • दररोज एकेक माळ वाढवली जाते. नऊ दिवसाच्या नऊ माळा होतात.
 • घटाशेजारी दिवा लावला जातो. तो विजू न देता सतत तेवत ठेवावा लागतो.
 • नवमीला घटाची पूजा करून नैवेद्य दाखवून घट उठवले जातात.
 • प्रतिपदेपासूनच घरात जव पेरण्याचा विधान आहे. नवमीच्या दिवशी या जवानां डोक्यावर ठेवून एखाद्या नदी किंवा तलावात विसर्जित करावे.
 • अष्टमी आणि नवमी या महातिथी असतात. या दोन्ही दिवसात पारायण केल्यावरच हवन करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार कुमारिकांना जेवायला द्यावं.

हेही वाचा –

Navratri 2020: देवीला दाखवा आगळा वेगळा नैवेद्य