Navratri 2020: नवरात्रीत ९ दिवस देवीला दाखवले जाणारे ९ नैवेद्य

navaratri special navratri 9 days 9 naivedya
Navratri 2020: नवरात्रीत ९ दिवस देवीला दाखवले जाणारे ९ नैवेद्य

नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात. प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवाव, जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल. असे वाटत असते. दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्या शिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणार नऊ नैवेद्य पाहणार आहोत.

  1. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रुप माता शैलपुत्रीचे पुजन केले जाते. यादिवशी देवीला गायीचे शुद्ध तुप अर्पण केले जाते. यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो.
  2. त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पुजा केली जाते. मात ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे घरातील सदस्याचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते.
  3. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पुजा केली जाते. यादिवशी देवी दुध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यामुळे दुःखपासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते.
  4. चौथ्या दिवशी माता कुष्माण्डाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते.
  5. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पुजा-अर्जा केली जाते. यादिवशी देवीला कळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे शरीर स्वस्थ राहते.
  6. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रुपाची म्हणजे कात्यायनी मातेची पुजा केली जाते. देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामुळे उपवास करणाऱ्याची कांती तेजोमय होते.
  7. सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट जेवासहित ब्राम्हणाला दान करावे. यामुळे उपवास करणाऱ्यावर येणार संकट दूर होते.
  8. अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रुपाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो.
  9. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा. हा उपवास केल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते.