नवरात्रीच्या उपवासामधे काही लोकांना शिरा चालतो आणि काही नाही. त्यामुळे आज आपण उपवासाला चालणार भगरीचा शिरा कसा तयार करतात हे पाहणार आहोत.
साहित्य
- १ वाटी भगरीच पीठ
- १ वाटी पिठी साखर
- वेलची पुट
- अर्धी वाट खोबऱ्याचा किस
- ड्रायफ्रूट्स
- १ वाटी दूध
- साजूक तूप
कृती
एका कडईत २ ते ३ चमचे साजूक तूप घाला. त्यानंतर तूप वितळल्यानंतर त्यामध्ये भगरीचे पीठ घालायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवून लालसर होईपर्यंत भगर तूपामध्ये भाजायचं. भगरीचं पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर भगर तूप सोडू लागतं. तसंच पीठाला जाळी येते. त्यामुळे यानंतर या मिश्रणात १ वाटी दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मग त्यामध्ये १ वाटी पिठी साखर घालायची आणि दीड चमचा वेलची पावडर घालायची. पुन्हा हे मिश्रण एकजीव करुन घ्यायचं. एकजीव झाल्यानंतर १ ते २ वेळा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. त्यानंतर ड्रायफ्रूड मिश्रणावर टाकायचे. अशा प्रकारे तुम्ही भगरीचा शिरा तयार करू शकता.