घरताज्या घडामोडीनवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: तिखट डोसा

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: तिखट डोसा

Subscribe

आपण तांदळाचा, उडदाच्या डाळीचा डोसा पाहिला आहे. पण आज आपण वरई आणि साबुदाणाचा डोसा कसा तयार करतात हे पाहणार आहोत. हा डोसा तुम्ही उपवासाच्या दिवशी देखील खाऊ शकता.

साहित्य

- Advertisement -
  • अर्धा कप वरई
  • अर्धा कप साबुदाणा
  • पाणी
  • अर्धा कप दही
  • मीठ
  • कोथिंबीर
  • जिरे
  • हिरवी मिरची
  • शेंगदाणे

कृती

प्रथम एका भांड्यामध्ये अर्धा कप वरई आणि अर्धा कप साबुदाणा घालायचा. मग त्यामध्ये दोन कप पाणी घालून स्वच्छ धुवाचा. मग पुन्हा दोन कप पाणी घालून वरई आणि साबुदाणा पाच ते सहा तास भिजवत ठेवायचं. मग मिश्रणातील पाणी टाकून ते मिश्रण मिक्सरा बारीक करून घ्यावे. जसं आपण डोसाचं पीठ तयार करतो त्याप्रमाणे हे पीठ बारीक करायचं आहे. त्यानंतर अर्धा कप दही फेडून त्यात घालून ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिश्रण तासभर झाकून ठेवायचं. आता मसालासाठी मिक्सरच्या भांड्यात मूठभर दोन तिखट हिव्या मिरच्या, कोथिंबीर, एक चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून हा मसाला व्यवस्थित बारी करून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये शेंगदाणाने टाकून मिश्रण बारीक करून घ्यायचं. मग डोसाच्या मिश्रणात तिखट तयार केलेला मसाला घालायचा आणि व्यवस्थित मिश्रण एकजीव करायचं. त्यानंतर गरम तव्यावर साजूक तूप टाकून त्यावर डोसाचं पीठ टाकायचं. अशा प्रकारे तुम्ही तिखट डोसा करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -