असा साजरा करतात भारतातील वेगवेगळ्या राज्यात नवरात्र उत्सव

प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे. प्रत्येकाच्या संस्कृतीनुसार प्रत्येक सण साजरे करण्याची पद्धतही वेगवेगळी पहायला मिळते.

असा साजरा करतात भारतातील वेगवेगळ्या राज्यात नवरात्र उत्सव

भारत हा विविध जाती,धर्म,भाषा,सण अशा वैविध्यतने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे. प्रत्येक राज्याची भाषा, राहण्याची पद्धत तिथली खाद्य संस्कृती वेगळी आहे. तिथल्या संस्कृतीचा तिथल्या प्रत्येक लोकांच्या बोलण्यावर राहणीमानावर त्याचा प्रभाव जाणवतो. प्रत्येकाच्या संस्कृतीनुसार प्रत्येक सण साजरे करण्याची पद्धतही वेगवेगळी पहायला मिळते.
नवरात्र म्हणजे नऊ रात्र. नवरात्र हा सण जो देशातल्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जाणून घेऊया दक्षिण,उत्तर,पश्चिम आणि पूर्व भारतात नवरात्र उत्सव कसा साजरा केला जातो.

१ – पूर्व भारत

पूर्व भारताच्या ईशान्येकडील राज्यात शारदिय नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस ‘दुर्गा पूजा’ म्हणून साजरे केले जातात.यात ‘दुर्गा देवी’ची पुजा केली जाते. दुर्गादेवी हि सिंहावर विराजमान आहे. तिच्या हातात अनेक आयुध आहेत. दुर्गा देवीचे वाहन सिंह हा धर्म आणि इच्छाशक्ती दर्शवतो. देवीच्या हातातील शस्रे हि मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तीव्रता सूचित करतात. पूर्व भारताच्या बंगाल सारख्या राज्यात दुर्गादेवीच्या सुंदर अशा मुर्ती रेखाटल्या जातात. या मुर्ती सजवून त्यांची मंदिरात पूजा केली जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात.नवरात्रीचा आठवा दिवस हा दुर्गाअष्टमी म्हणून साजरा केला जातो. पूर्व भारतात महिनाभर आधीच नवरात्रीची तयारी केली जाते. तिथे नवरात्र उत्सव हा ‘दुर्गा पूजा’ म्हणून ओळखला जातो. दुर्गा देवीच्या भव्य अश्या मुर्ती पहायला मिळतात. इथल्या देवींच्या मंडपात भव्य असं डेकोरेशन केले जाते. रोज संध्याकाळी ढोलांच्या आवाजात महाआरती केली जाते. या वेळी इशल्या स्रीया पारंपरिक वेशातील गडद रंगांच्या साड्या नेसतात.

२- पश्चिम भारत

 


पश्चिम भारतात विशेषत: गुजरात राज्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुजरात मध्ये गरबा नृत्याला विशेष महत्त्व आहे. पश्चिम भारतात नवरात्रीचे नऊही दिवस रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यत गरबा खेळला जातो. इथल्या स्रिया,पुरूष, मुले सुंदर असा वेश करून गरबा खेळतात. प्रत्येक शहाराचा वेगळया प्रकारचा गरबा इथे खेळला जातो. उत्तर भारतात देवीच्या पुजेपेक्षा गरबा खेळण्याला जास्त महत्त्व दिले जाते. गरबा किंवा गर्भा म्हणजेच ‘देवीचा गर्भ’. माती पासून तयार केलेल्या मडक्याला ‘गरबा’ असं म्हणतात. त्यात दिवा पेटवतात. त्या गरब्याला सुंदर रंदरंगोटी करून त्यांची पुजा केली जाते. त्याभोवती स्रिया आर्कषक फेर धरून नाचतात त्यालाच गरबा असं म्हणतात.

३ – उत्तर भारत

उत्तर भारतात नवरात्र उत्सव हा प्रभू रामचंद्राचा विजय म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतात रामाने रावणाचा वध केला होता. दसऱ्याच्या दिवशी रामलिला या नाट्याचे सादरिकरण करून नवरात्री उत्सवाची सांगता केली जाते. विजया दशमीच्या दिवशी दृष्ट शक्तींचा नाश केला जातो. उत्तर भारतात या दिवशी रावण आणि कुंभकर्ण यांच्या प्रतिमांचे दहन केले जाते.
उत्तर भारतात नवरात्रीच्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. घरगुती वस्तू, मिठाई दिल्या जातात. स्री पुरूष नवीन कपडे घालतात. यात दिवशी कन्यापूजनही केलं जाते. नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी कन्यापूजन केले जाते. त्यांची देवीप्रमाणे पुजा केली जाते. त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. कला, संगीत आणि ज्ञान, देवीची रूपे याबद्दल आदर व्यक्त केला जातो. नवरात्रीच्या नऊही दिवस पूजा,होम हवन, यज्ञ, उपवास गायन,वादन ,नृत्य,केले जाते. देवीची मनोभावे पुजा केली जाते.

४ – दक्षिण भारत

दक्षिण भारतात नवरात्र म्हणजेच ‘दसरा’ म्हणून साजरा केला जातो. या सणाला ‘म्हैसूर दसरा’ असं म्हटलं जातं. हा दसरा म्हैसूर राजघराण्याकडून आयोजित करण्यात येतो म्हणून त्याला म्हैसूर दसरा म्हटलं जात. ‘जम्बो सवारी’ हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. दक्षिण भारतात नवरात्रीचे नऊ दिवस पुराणाकथेवर आधारित नाट्य, महाकाव्य, नृत्य, यक्षगान सादर केले जातात. नवरात्रात दक्षिण भारतातील प्रत्येक घरांमध्ये वेगवेगळ्या बाहुल्यांचे प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनाला कन्नडमध्ये गोंबे हब्बा, तामिळमध्ये बोम्माई, मल्याळममध्ये बोम्मा गुल्लू म्हणतात.तसेच तेलगुमध्ये याला बोम्माला कोलुवू असंही म्हणतात. केरळमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘विद्यारंभ’ म्हणजेच मुलांना शिकवायला सुरूवात करतात. दक्षिण भारतातील म्हैसूर येथे रस्त्यावरून चामुंजा देवीची भव्य अशी मिरवणूक काढली जाते.


हेहि वाचा – Navratri 2020: नवरात्रीत ९ दिवस देवीला दाखवले जाणारे ९ नैवेद्य