Navratri 2020: देवीला दाखवा आगळा वेगळा नैवेद्य

Navratri 2020: देवीला दाखवा आगळा वेगळा नैवेद्य

यावर्षी अधिक मास आल्याने दसरा आणि नवरात्र एक महिना उशिराने येत आहे. नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत. १७ ऑक्टोबरलपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. संपूर्ण देशभरात हा सण उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात भक्तिभावाने भाविक देवीची पूजा-अर्चा करून नऊ दिवस उपवास करतात. दरम्यान आज आपण या उत्सवात देवीला गुजराती पद्धतीचा नैवेद्य कसा करतात हे पाहणार आहोत. या पदार्थाला ‘कंसार’ असे म्हणतात.

साहित्य

गव्हाचे पीठ (दाणेदार), पाणी, गूळ, तुप आणि ड्रायफ्रुट्स

कृती

पहिल्यांदा जेवढी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानुसार पाव वाटी पाणी, गूळ, तुप घ्यायचे आहेत. हा पदार्थ करताना सर्वात आधी कडई गॅस ठेवून ती थोड्यावेळ गरम होऊन द्यायची. मग त्यामध्ये तुप घालायचं. त्यानंतर त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालायचं. मग त्यात पाऊस वाटी किसलेला गुळ घालायचा. हे सर्व मिश्रण चांगलं उकळवून द्यायचं. महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर त्यात गव्हाचं पीठ टाकताना गॅस कमी करायचा. मिश्रणात गव्हाचं पीठ टाकत टाकत ते मिश्रण नीट हलवायचं आहे. यामुळे गव्हाच्या पीठाच्या गाठी होणार नाहीत. गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर ते शिजवण्यासाठी साधारणतः ५ मिनिटे ठेवायचं आहे. ५ मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे. अशा प्रकारे तुम्ही गुजराती पद्धतीचा ‘कंसार’ हा देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकतात.