घरताज्या घडामोडीनवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: क्रिस्पी बाईट

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: क्रिस्पी बाईट

Subscribe

नवरात्रीत उपवास असला तर काहीतरी झटपट होणार पदार्थ तयार करावासा वाटतो. तसेच स्वयंपाक घरात जास्त पसारा होऊ ने म्हणून आपण कमी साहित्य एखाद्या पदार्थ करू रिकामी होतो. त्यामुळे आज आपण झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होणार पदार्थ पाहणार आहोत. या पदार्थाचं वैशिष्ट म्हणजे तुम्ही हा आठवड्याभर ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे असेल तेव्हा खाऊ शकता.

साहित्य

- Advertisement -
  • १ कप वरई तांदूळ
  • तूप
  • पाणी
  • जीरे
  • हिरवी मिरची
  • मीरपुड
  • मीठ
  • शेंगदाण्याचा कुट
  • बटाटा
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस

कृती

सर्वप्रथम वरई तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर एक कडई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घाला. मग त्यामध्ये दोन कप पाणी घाला. त्यानंतर त्यामध्ये एक लहान चमचा जिरे, बारीक कापलेली हिरवी मिरची, एक लहान चमचा मीरपुड घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळूहळू वरईचे पीठ घाला. सर्व पीठ एकत्र टाकू नका. महत्त्वाचे म्हणजे गॅस मंद आचेवर ठेवून पीठ मिश्रणात मिक्स करा आणि ते सतत ढवळत राहा. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. जेव्हा हे मिश्रण दाट होईल तेव्हा तेव्हा गॅस बंद करा. जास्तपण घट्ट मिश्रण करू नका नाहीतर तुमचे बाईट कडक होतील. मिश्रण कडई सोडू लागल्यानंतर कडई गॅसवरून उतरवून मिश्रण थोड थंड करायला ठेवा. मग त्यामध्ये २ चमचे शेंगदाण्याचा कुट घाला. त्यानंतर एक उकडलेला किसलेले बटाटा घाला. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक चमचा लिंबाचा रस घालायचा. मग हाताला तेल लावून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. एका ताटाला तेल लावून त्यात सर्व मिश्रण घाला. त्यानंतर १० ते १५ मिनिटे तसेच मिश्रण ठेवा त्यानंतर बाईट्स चौकोनी आकारात कापून घ्या. असे बाईट तयार करून तुम्ही ते एका डब्यात ठेवून ते फ्रिजरमध्ये ठेवा. तसेच जेव्हा तुमचा उपवास असेल त्यावेळेस तुम्ही हे तळून खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -