नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: राजगिऱ्याचे थालीपीठ

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: राजगिऱ्याचे थालीपीठ

उपवास असला की सतत तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक वेगळा पदार्थ खास उपवासाठी सांगणार आहोत. त्या पदार्थाचं नाव राजगिऱ्याचे थालीपीठ असं आहे. तुमचा जर नवरात्रीमध्ये उपवास असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. 

साहित्य

  • २ वाटी राजगिऱ्याचं पीठ
  • दोन बटाटे
  • पाव वाटी कोथिंबीर
  • अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट
  • पाच हिरव्या मिरच्या
  • एक चमचा आल्याची पेस्ट
  • साखर
  • मीठ

कृती

प्रथम एका ताटात दोन वाटी राजगिऱ्याचं पीठ घेऊन त्यामध्ये दोन बटाटे सोलून जाड किसून घालायचे. मग त्यामध्ये पाव वाटी कोंथिबीर, अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, एक चमचा आल्याची पेस्ट (जर तुम्हाला उपवासाठी आलं चालतं नसेल तर तुम्ही ते नाही घातलं तरी चालेलं) पाच ते सहा चमचे साखर आणि चवीनुसार मीठ असे सर्व राजगिऱ्याच्या पिठात घालायचं. मग हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडंस पाणी घालून हे सर्व मिश्रण थोडं घट्ट मळून घ्यायचं. मग तुम्ही थालीपीठ तव्यावर किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवी थापून घ्यायचं. तुम्हाला ज्या पद्धतीने थापता येईल त्या पद्धतीने थालीपीठ थापायचं. मग थालीपीठ तव्यावर गरम तेलात मस्त भाजून घ्या. अशा प्रकारे तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून थालीपीठ तयार करा.