नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: वरईचे आप्पे

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: वरईचे आप्पे

नवरात्री नऊ दिवस उपवास असल्यामुळे आपल्याला वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळे आज आपण खास उपवासासाठी वरईचे आप्पे कसे करतात ते पाहणार आहोत. 

साहित्य

  • १ कप वरई
  • पाव कप साबुदाणा
  • कोथिंबीर
  • ३ कप दही
  • जिरे
  • मीठ
  • खायचा सोडा
  • हिरव्या मिरचाच ठेचा

कृती

सर्व प्रथम साबुदाणा मिक्सरला दळून घ्यायचा. दळून झाल्यानंतर त्यामध्ये वरई घालून पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं. मग साबुदाणा आणि वरई मिश्रण एक बाउलमध्ये काढून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये जिरे एक टिस्पून, खायचा सोडा एक टिस्पून, हिरव्या मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर मिश्रणात थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं. अशा प्रकारे तुम्ही उपवासाच्या आप्प्यांचं पीठ तयार करायचं. (टिप – पीठ जास्त पातळं आणि जास्त घट्ट नको) आप्प्यांचं पीठ तयार झाल्यानंतर ते १५ ते २० मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर आप्पे पात्र गरम करून त्यामध्ये तेल सोडायचं आणि जे बॅटर तयार करून घेतलं आहेत ते आप्पे पात्रात घालायचं. मग झाकणं ठेवून ते २ ते ३ मिनिटं शिजवून घ्यायचं आणि पुन्हा त्यात तेल सोडून दोन्ही बाजूनं नीट भाजून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही उपवासाचे आप्पे तयार करू शकता.