घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजीप दरीत कोसळून ६ मजुरांचा मृत्यू

जीप दरीत कोसळून ६ मजुरांचा मृत्यू

Subscribe

नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना, जीप ५०० फूट खोल दरीत

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अतिदुर्गम भागात मजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

तोरणमाळ खडकी रस्त्यावर ही घटना घडली आहे. गावातील काही मजुरांना नियमितपणे ही जीप ये-जा करत होती. शनिवारी सकाळी तोरणमाळ खडकी रस्त्यावर अचानक या जीपला अपघात झाला. अपघातानंतर जीप खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात जीपचा फक्त सांगाडाच उरला आहे. दरीत ठिकठिकाणी मजुरांचे मृतदेह पडून आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह स्थानिक गावकर्‍यांनी धाव घेतली. दरीत मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर काही जणांचे मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलीस घटनास्थळी दाखल झालेे. जखमी मजुरांना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडी खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांचा शोध सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -