घरमतप्रवाहभाग ८ - महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा पाया रचणारे पवार साहेब

भाग ८ – महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा पाया रचणारे पवार साहेब

Subscribe

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी "साहेब माझा विठ्ठल" या सदराखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक, राजकीय जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या घटनांवर आधारीत लेख लिहिले आहेत. त्या लेखांची ही मालिका.

पवार साहेब १९८८ सालात राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तेव्हा देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात, महाराष्ट्राचा वाटा हा २५ टक्के होता. तसेच, याच क्षेत्रात एकूण देशाच्या तुलनेत १६ टक्के रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या.

१९८८ साली साहेबांनी या रोजगार निर्मितीला गती दिली. त्यासाठी त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. छोट्या-लहान उद्योगधंद्यांना सवलती दिल्या. त्यामुळे झाले काय? तर, १९९० पर्यंत, म्हणजे १-२ वर्षातच तब्बल ३२,००० लघुउद्योग, तर १,००० मध्यम आणि मोठे उद्योग राज्यात नोंदवले गेले. हा एक विक्रम आहे.

- Advertisement -

मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन शहरांभोवतीच राज्याचा औद्योगिक विकास अडकला होता. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी या अडकलेल्या विकासाला राज्याभर पसरवणे गरजेचं होतं. यासाठी साहेबांनी १९८८ साली या ३ भागांना वगळून राज्यात सर्वत्र नवी औद्योगिक केंद्र निर्माण व्हावीत, म्हणून देशी-परदेशी उद्योजकांना “प्रोत्साहन पॅकेज” जाहीर केले. त्यात विशेष सवलती होत्या. यामागे मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातच गुंतवणूक न होता, राज्यात इतरत्र गुंतवणूक व्हावी आणि त्या त्या भागातील उद्योजकांप्रमाणेच तरुणांनाही रोजगाराच्या संधी या गावाजवळच उपलब्ध व्हाव्यात, हा त्यामागचा मुख्य हेतू होता.

औद्योगिकदृष्ट्या मागास असणाऱ्या विदर्भ आणि मराठवाडा या भागात नवीन उद्योग यावेत, हे धोरण साहेबांनी १९८८ सालीच निश्चित केलं होत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत विदर्भात “बुटामोरी” येथे निर्माण करण्यात आली.

- Advertisement -

सोबतच महाराष्ट्रभरातील १६५ ठिकाणांची निवड “ग्रोथ सेंटर्स”, म्हणून करण्यात आली होती. या ठिकाणांचा विकास वेगवान व्हावा, यासाठी त्यावर, “टास्क फोर्स”ची स्थापना साहेबांनी केली होती. या १६५ पैकी ९४ ठिकाणांना “ग्रोथ सेंटर” म्हणून मान्यता देण्यात आली. त्याचवेळी मुंबईमध्ये समुद्रात मोठ्या प्रमाणात “नैसर्गिक वायू” सापडला होता. या वायूवर आधारित उद्योग कोकणात, रायगड जिल्ह्यात उभे राहावेत, यासाठी पवार साहेबांनी ‘केंद्र सरकार’कडे आग्रह देखील धरला होता.

नवनव्या उद्योगांवर लक्ष ठेवून पवार साहेबांनी, “सेंटर फॉर डेव्हप्लमेंट ऑफ मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स” आणि “एलकंट्रोनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर” स्थापन करण्याची सुरवात देखील पवार साहेबांनीच केली होती.

या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक मोठमोठे देशी – परदेशी उद्योग महाराष्ट्रात आले आणि पसरले देखील! यात जनरल मोटर्स, प्याजो, स्कोडा, फॉक्स वॅगन, मर्सडीज, जेसीबी इत्यादि मोठ्या परदेशी कंपन्यांचा आणि महिंद्रा, बजाज सारख्या देशी कंपन्यांचा समावेश आहे. या सार्या कंपन्यांनी राज्यभरात आपल्या उद्योगाचा वाढ-विस्तार केलाय.

यातून सुटे भाग बनविणार्या रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. केवळ पुणे, नाशिक, औरंगाबाद या तीन ठिकाणीच मिळून ६०,००० च्या वर कुशल तांत्रिक रोजगार निर्माण झाला. अकुशल आणि अर्धकुशल कामगारांची संख्या तर लाखोंच्या घरात आहे. शिवाय वरील आलेल्या कंपन्यांना अन्य सेवा पुरवणाऱ्या कितीतरी छोटे- मोठे व्यावसायिक आणि पुरवठादार निर्माण झाले. त्यांचीही संख्यां हजारोंच्या घरात आहे.

महाराष्ट्राचे आजचे आधुनिक रूप, हे साहेबांनी पाहिलेल्या उद्योग आणि रोजगार निर्मितीच्या समृध्द स्वप्नांवर आणि त्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमावर उभं आहे..!

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -