Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर मतप्रवाह लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त १०० परिवारांना धान्यवाटप

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त १०० परिवारांना धान्यवाटप

Mumbai
annabhau sathe jayanti

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी उत्सव संपुर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला. लॉकडाऊनचे नियम पाळत राज्यभरात १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. बोरीवलीमधील काजूपाडा येथे देखील साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मित्र मंडळ आणि त्रिभुवन धुरिया फाऊंडेशनतर्फे सामाजिक उपक्रम हाती घेऊन जयंती उत्साहात संपन्न झाली. जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे दोन्ही संस्थांच्यावतीने १०० गरीब कुटुंबांना मोफत धान्यवाटप करण्यात आले.

काजूपाडा येथे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मित्र मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी होत असते. मात्र यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे जयंतीला जाहीर स्वरुप देण्यात आले नाही. लॉकडाऊन असल्यामुळे मातंग समाजातील हातावर पोट असलेल्या अनेक लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. त्यामुळे या कुटुंबांना सध्या ज्याची सर्वात मोठी गरज असेल तर ती होती धान्याची. ही गरज ओळखून उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्यांनी मोफत धान्यवाटप करण्याचा निर्णय घेतला.

annabhau sathe jayanti2

त्रिभुवन धुरिया फाऊंडेशनचे अध्यक्ष त्रिभुवन धुरिया आणि कार्याध्यक्ष कल्पेश लोके यांनी धान्य पुरविण्याची जबाबदारी उचलली. त्रिभुवन धुरिया फाऊंडेशनने लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी रेशन, अत्यावश्यक वस्तू वितरीत करण्याचे काम केले आहे. काही वस्तीमध्ये मेडिकल कॅम्प घेऊन कोरोनापासून लोकांचे सरंक्षण व्हावे, यासाठी आरोग्य किटचे वाटपही फाऊंडेशनने केले आहे. या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीला त्यांनी १०० कुटुंबांना मोफत अन्नधान्य देण्याची जबाबदारी उचलली, अशी माहिती अध्यक्ष त्रिभुवन धुरीया यांनी दिली.

‘आधी पोटातली आग, मग डफावर थाप’ या न्यायाने आज लोकांचे पोट भरणे गरजेचे आहे. जयंतीव्यतिरीक्तही आम्ही लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करत आहोत, अशी माहिती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष सुर्यवंशी यांनी दिली. तर फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष कल्पेश लोके म्हणाले की, “अण्णाभाऊंना अभिवादन करताना आम्हाला त्यांचा कामगार क्रांतीचा विचार प्रेरीत करतो. आज लॉकडाऊनमुळे कामगार रस्त्यावर आलाय. त्याला जगविण्याचे काम आम्ही आमच्यापरिने करत राहू.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here