घरपालघरअंबाडी वीज वितरण कार्यालयाला श्रमजीवीने ठोकले टाळे

अंबाडी वीज वितरण कार्यालयाला श्रमजीवीने ठोकले टाळे

Subscribe

श्रमजीवी संघटनेने ८ दिवसात पूर्णवेळ अभियंता नियुक्त झाला नाही तर कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला होता. त्यानुसार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार आदिवासी गरीब वीज ग्राहकांना सोबत घेऊन अंबाडी वीज वितरण कार्यालायला टाळे ठोकले.

भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील विजवितरण कार्यालयाला श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी टाळे ठोकले. या ठिकाणी पूर्णवेळ अभियंता नाही. तर मंजूर १४ पदांपैकी केवळ ६ कर्मचारी कार्यरत आहेत. ९० गावांचा भार हे केवळ ६ कर्मचारी सांभाळतात परिणामी ग्राहकांच्या वाढीव बिल आणि इतर तक्रारी आजही तशाच आहेत. याबाबत मागच्या आठवड्यात आंदोलन करून श्रमजीवी संघटनेने ८ दिवसात पूर्णवेळ अभियंता नियुक्त झाला नाही तर कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला होता. त्यानुसार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार आदिवासी गरीब वीज ग्राहकांना सोबत घेऊन अंबाडी वीज वितरण कार्यालायला टाळे ठोकले.

श्रमजीवीने दिली होती ८ दिवसाची वेळ

वीज वितरण विभागाने वाढीव आणि चुकीची बिलं देऊन येथील सर्वसामान्य नागरिकांना, आदिवासी गरीब मजूर आणि शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार निवारण यंत्रणा नाही. सर्वकाही “आंधळा दळतय आणि कुत्रा पीठ खातोय”, अशी अवस्था झाली आहे. याबाबत आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले असून सर्वसामान्य गरीब कष्टकरी वीज ग्राहकांच्या हितासाठी आंदोलन सुरुच राहणार, असे यावेळी श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांनी सांगितले. वीज वितरण अधिकाऱ्यांनी शब्द पाळला नाही. मात्र, आम्ही दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आज ठरलेल्या दिवशीच टाळे ठोकले असेही ते म्हणाले. यावेळी अंबाडी एम एस इ बी कार्यालयाचा मिटर आंदोलकांनी तपासला, ग्राहक क्रमांक 013100000860 हा अंबाडी वीज वितरण कार्यालयाचा मीटर आहे. गरिबांची, आदिवासींची बिल थकली म्हणून वीज कनेक्शन कट करणाऱ्या या एमएसइबी ऑफिसने स्वतःच्या ऑफिसचे बिल १६ महिने भरले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. याबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावेळी श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार, जया पारधी, आशा भोईर, नवनाथ भोये, ओमकार पारधी, आकाश भोईर, रुपेश जाधव, तारामती जाधव, शर्मिला पवार, सीताबाई पवार आणि शेकडो तक्रारदार यावेळी उपस्थित आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सीबीडीत 80 गुंतवणूकदारांची फसवणूक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -