Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर पालघर वाढवण बंदर प्रकल्प सामंजस्याने पुढे गेला पाहिजे - चंद्रकांत पाटील

वाढवण बंदर प्रकल्प सामंजस्याने पुढे गेला पाहिजे – चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

कुणाचं तरी नुकसान होऊन तो प्रकल्प होत असतो त्याला विरोध होत असतो. पण सामंजस्याने आणि समजुतीने पुढे जायचे असते. त्यामुळे हा वाढवण बंदर प्रकल्प हा सामंजस्याने पुढे गेला पाहिजे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वाडा येथे ते प्रसार माध्यमांशी बोलताना वक्तव्य केले. माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबाचे सात्वंन करण्यासाठी चंद्रकांत पाटील आज सावरा यांच्या वाट्यातील घरी पोहोचले होते.

पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर हे सागरी किनारपट्टी भागात होत आहे. हे बंदर केंद्र सरकारचे आहे. यावर वाढवण विरोधी संघर्ष समिती ही या बंदरबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊ पाहत आहे. मात्र ती भेट होत नाही आहे, असा आरोप समितीकडून होत आहे. या वाढवण बंदरबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले.

- Advertisement -

आता त्यांनी यावर एखादा रस्ता तरी रुंद करायचा असेल तर शेतकरी विरोध करीत असतो. सामंजस्याने प्रकल्प पुढे गेला पाहिजे. कायदे दाखवून, दंडेलशाही करून आणि नुकसानी भरपाईची आमिष दाखवून चालत नाही. समजून जा की धरण नाही झाले तर तेथील हजारो एकर शेती कशी होणार, बंदर नाही झाले तर रोजगार कसा मिळणार व्यापार कसा होणार, श्रीमंती कशी येणार असे वक्तव्य करून वाढवण बंदर प्रश्नी हा प्रकल्प सामंजस्याने प्रकल्प पुढे गेला पाहिजे, असे मत चंद्रकांत पाटलांनी यावेळी व्यक्त केले.

वाढवण बंदर प्रश्र्नी मुख्यमंत्री वेळ देत नाहीत 

पालघर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराच्या बाबत वाढवण विरोधी संघर्ष समितीकडून बंदर विषयी राज्याचे मुख्यमंत्री हे भेट देत नाहीत अशी ओरड आंदोलककाकडून केली जातेय. मुख्यमंत्र्यांनी वाढवण बंदरबाबत आंदोलनर्त्यांचे एकले पाहिजे आणि भेट दिली पाहिजे. त्याचबरोबर हा प्रोजेक्ट केंद्र सरकारचा आहे त्यामुळे मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही, असे प्रश्न उपस्थित पत्रकारांनी केल्याने चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बाबत आंदोलनकर्त्यांना भेट द्यावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण प्रश्नाबाबत आंदोनकर्त्यांचे एकले पाहिजे, समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि उत्तरे शोधली पाहिजेत. तसेच आंदोलनकर्त्यांना बरोबर घेऊन केंद्रात गेले पाहिजे.

बंदरमुळे होणारे परिणाम आणि नागरिकांमध्ये भय 

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. तिथे समुद्र किनारी राहणारा जो मच्छिमार आज वाढवण बंदर ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी समुद्रातील जैविक विविधता, तिथे प्रजननासाठी अतिशय योग्य आहे. परंतु, वाढवण बंदर झाले तर हे संपूर्णतः नष्ट होणार आहे.

मुख्यमंत्री फक्त मोदींना एकदा भेटलेत, मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावे

राज्याचे मुख्यमंत्री यांनी घराबाहेर पडावे. ते आतापर्यंत मोदींना फक्त एकदाच भेटले आहेत. राज्याचे प्रश्न, समस्या केंद्रात न्यायला हव्यात असे पाटलांनी नमूद केले.

चंद्रकांत पाटील माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे निधन झाले म्हणून ते सावरा यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी वाट्यात आले होते. त्यांनी माजीमंत्री विष्णू सावरा हे संघर्षातून पक्ष या भागात उभा केल्याचे आणि या भागात आमचे लक्ष राहील असे सांगून सावरा यांना श्रद्धांजली वाहिली.


हेही वाचा – वाढवण बंदराविरोधात कोळीवाड्यात कडकडीत बंद


 

- Advertisement -