Photo : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री रेखा आज त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनय कौशल्याने समीक्षकांची दाद मिळणाऱ्या रेखा यांनी सौंदर्य, दिलखेच अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ केले आहे. आजही त्यांच्या रुपाचे अनेक चाहते आहेत. नृत्य, कला, अभिनयासह त्यांचे विनोदी चित्रपटही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. कांजीवरम साडी, दागिने, माथ्यावर सिंदूर, आणि चेहऱ्यावर स्मितहास्य अशी रेखा यांची छवी बॉलीवूड कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे जाणून घेऊया.