निखळ हास्य…अस्सल सौंदर्याची राणी…स्मिता पाटील!

आपल्या नैसर्गिक सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनावर अभिनयाची भुरळ पडणारी मराठी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटील यांचा प्रवास हा दूरदर्शनवरील एक वृत्तनिवेदिका म्हणून झाला आणि ते आजही असंख्य प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. याच काळात दूरदर्शन मध्ये निवेदिका म्हणून काम करत असतांना दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी स्मिताच्या अभिनयाची क्षमता ओळखून त्यांनी तिला १९७५ मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटासाठी संधी दिली. परंतु या आधी १९७४ साली सामना मधल्या कमळी या व्यक्तिरेखेने स्मिता पाटील यांनी सर्वाना आपली झलक दाखवली. या पहिल्याच चित्रपटातील स्मिताच्या अभिनयाला रसिकांनी डोक्यावर घेतले आणि स्मिता पाटील यांनी कधीच मागे वळून पहिले नाही वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणा-या स्मिता या जवळजवळ ७५ चित्रपटात महाराणीच ठरली.

Mumbai