Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी बॉलिवूड अभिनेत्री बनिता संधू कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेत्री बनिता संधू कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड चित्रपटात काम करणारी ब्रिटिश अभिनेत्री बनिता संधूला कोरोना व्हायरसची लागण

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड चित्रपटात काम करणारी ब्रिटिश अभिनेत्री बनिता संधूला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. शूटिंगकरता बनिता २० डिसेंबरला कोलकातामध्ये आली होती. ती कोलकातामध्ये चित्रपट ‘कविता अँड टेरेल’ चित्रपटाची शूटिंग करत होती. दरम्यान, सोमवारी तिचे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून तिने कोलकाताच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नकार दिला. त्यामुळे तिला आता एका खासगी रुग्णालयात करण्यात आले आहे. दरम्यान तिने अशा फ्लाइटमधून प्रवास केला होता. ज्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेले तरुण प्रवास करत होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बनिताने ‘ऑक्टोबर’ चित्रपटात अभिनेता वरुण धवनसोबत प्रमुख भूमिकेत दिसली होती. माहितीनुसार, बिनीता संधू लवकर अभिनेता विक्की कौशलसोबत ‘सरदार उधम सिंह’ चित्रपटात दिसणार आहे.

- Advertisement -