Photo – Birthday Special; भक्ती बर्वे अभिनय क्षेत्रातील ‘ती फुलराणी’!

भक्ती बर्वे

भक्ती बर्वे-इनामदार या मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील परिचित नाव. आज, १० सप्टेंबर रोजी त्यांची जयंती असून या निमित्ताने त्यांच्या काही गाजलेल्या भूमिकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भक्ती बर्वे यांचे १२ फेब्रुवारी २००१ साली अपघाती निधन झाले. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. ‘फुलराणी’चे ११११ हून अधिक प्रयोग त्यांनी केले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. तसेच जाने भी दो यारो या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लक्षवेधी ठरली होती.