भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; सत्ता स्थापनेचा दावा नाही

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळांने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार या बड्या नेत्यांचा समावेश होता. राज्यपालांसोबत बैठक झाल्यानंतर भाजपच्या या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला नसल्याचे सांगण्यात आले.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here