Photo – बॉलीवूडच्या या ग्लॅमरस अदाकारा अडकल्या Drugs Connection मध्ये!

बॉलीवूडच्या ग्लॅमरस गर्ल सध्या एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी बसल्या आहेत. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुरू झालेल्या चौकशीतून बॉलीवूडमधील विविध पैलू समोर आले आहेत. त्यातच बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्शनही समोर आले आहे. रिया चक्रवर्ती हिच्या अटकेनंतर अनेक बड्या कलाकारांची नावे एनसीबीच्या यादीत सामील झाली असून एकेक करून एनसीबी या सर्व अभिनेत्रींची चौकशी करत आहेत. एकीकडे स्टायलिश, सौंदर्याची खाण असलेल्या या अभिनेत्री आता ड्रग्ज कनेक्शनसाठी एनसीबी अधिकाऱ्यांना उत्तरे देत आहेत.