अनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

बॉलिवूड प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याचे २००३ साली आरती बजाजशी लग्न झाले. आरती बजाज फिल्म एडिटर असून तिने अनुरागच्या बहुतेक चित्रपटात फिल्ड एडिटर म्हणून काम केले आहे. पण २००९ मध्ये अनुराग आणि आरतीचा घटस्फोट झाला. सध्या दोघांचे नातेसंबंध चांगले आहेत. दरम्यान २००१ मध्ये अनुराग आणि आरती बजाजची मुलगी आलियाचा जन्म झाला. ती आता १९ वर्षांची आहे. २०१७मध्ये आलियाने जेव्हा एज्युकेशन ऑफ गर्ल्स या विषयावर डॉक्युमेंटरी केली होती तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. त्यानंतर ट्विटरवर अनुरागलाच नाही तर आलिया देखील ट्रोल केले गेले आहे. सध्या आलिया कश्यप बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींना तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे टक्कर देत आहे.

अनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर