पाहा – महेश मांजरेकरच्या मुलीचे गॉर्जियस फोटो

बॉलिवूडसोबतच मराठी अभिनेता महेश मांजरेकर यांची लहान मुलगी सई मांजरेकर हिचे गॉर्जियस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mumbai

भारतच्या तगड्या यशानंतर अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी सिनेमा दबंग ३च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘दबंग ३’ मध्ये सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. या सिनेमात बॉलिवूडसोबतच मराठी अभिनेता महेश मांजरेकर आणि त्यांची लहान मुलगी सई मांजरेकर यांनाही संधी देण्यात आली आहे. सई मांजरेकर या सिनेमात दिसणार ही चर्चा सुरु असताना सध्या तिचे सोशल मिडियावर गॉर्जियस फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. सई ही प्रचंड ग्लॅमरस असून ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते.