उन्हाळ्यात ही फळे खा, आरोग्य उत्तम ठेवा!

Mumbai

उन्हाळा सुरु झाला की, उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होते. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्याचा उन्हाळा जास्तच दाहक बनला आहे. या गर्मीत थंडावा मिळण्यासाठी आपण शीतपेये, रस्त्यावरील ज्यूस आदींच्या आहारी जातो. या थंड पेयातून तात्पुरता थंडावा मिळत असला तरी आरोग्यासाठी ते किती फायदेशीर आहे? हा मोठा प्रश्नच… आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही आणि उन्हाच्या काहिलीपासून थोडा थंडावा मिळेल अशा फळांचे सेवन केले पाहिजे. निसर्ग प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला निरनिराळी फळं देतो. या फळांचे सेवन केल्यास उन्हाचा त्रास आणि आजार दोन्ही दूर ठेवू शकतो. जाणून घेऊया या थंडगार फळांबद्दल…

१) ताडगोळे

tatgole-655x360

शरीराचा दाह कमी करणारे आणि जीभेचे चोचले पुरवणारे फळ म्हणजे ताडगोळा. शहरातल्या बाजारपेठेत अनेक ठिकाणी ताडगोळ्याची विक्री मोठ्या प्रमाणात या उन्हाळ्यात होते. ताडगोळे हे उष्णतेचा दाह कमी करतातच सोबत ते आरोग्यासाठी खूप लाभदायी असतात. ताडगोळे घेताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे ते मऊ आणि पाणीदार असले पाहीजे. मोठे दिसणारे ताडगोळे हे थोडेसे कडक असल्याने त्याची मजा तुम्हाला घेता येणार नाही.

२) कलिंगड

Watermelon

कलिंगड मध्ये अधिक प्रमाणात पाणी असते जो आपल्याला उन्हाळ्यात हाइड्रेट ठेवतो, म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवतो. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. कलिंगडामध्ये साधारण पणे ९५ टक्के पाणी असते. म्हणूनच उन्हाळ्यात जास्तीत जास्त कलिंगड खाल्ले की शरीराला चांगला गारवा मिळतो. उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो.

३) द्राक्ष

Table_grapes_on_white

उन्हाळ्यात द्राक्ष खाल्ल्याने ती तुम्हाला हायड्रेड राहण्यास मदत करतात. अनेक पोषक तत्वांनी पोषक असलेली द्राक्ष खाल्याने आपली तहान व भूक दोन्ही मिटवली जाऊ शकते.

४) अननस

pineapple-fruit

उन्हाळ्यात अननस खाल्ल्याने शरीरातील फॅट्स आणि प्रोटिन्स सहज पणे पचवले जातात. तसेच शरीरातील उष्णतेला नियंत्रित ठेवण्यास देखील अननसामुळे मदत होते. अननसाच्या आंबटगोड चवीमुळे जिभेचे चोचले देखील पूर्ण होतात.

५) लिंबू

lemon (1)

घरामध्ये नेहमी उपलब्ध असलेले फळ म्हणजे लिंबू. लिंबू मध्ये खुप प्रमाणत विटामिन्स असतात त्यामुळे हे पाणी व साखरेच्या मिश्रणात मिसळवून त्यात थोडे मीठ टाकून प्यावे. आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल तसेच आपल्याला उर्जा मिळेल .

६) पेरू

guava

पेरू हे सोडीयम आणि फॅट्स फ्री असतात. तसेच यात विटामिन्स C जास्त प्रमाणत उपलब्ध असतात जे आपल्याला खोकला, ताप, जुलाब यांसारख्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

७) नारळपाणी

coconut water

जर आपल्याला भूक किंव्हा तहान लागली असेल तर आपण याचे सेवन करू शकता. त्यामध्ये विटामिन्स, मिनरल्स व इलेक्ट्रोलाईट असतात जे आपल्या शरीराला हाइड्रेट ठेवतात.तर मग ही काही फळे आहेत जी उन्हाळ्यात सहजपणे बाजारात मिळतात आणि जी खाल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि आपण तंदुरुस्त राहतो.

मग आजच घेऊन या यातील काही फळे. उन्हाचा दाह कमी करण्यासाठी उसाचा रस, लिंबू सरबत, कैरीच पन्हे, शहाळे, असे अनेक पर्याय उन्हाळ्यात आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here