पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या आज जन्म दिवस. त्यांच्या जन्म १३ जानेवारी १९४९ साली झाला. १९६६ साली १८ वर्षांच्या वयातच त्यांनी भारतीय वायुसेनेमध्ये कॅडेट म्हणून प्रवेश मिळवला होता. इस्रो आणि सोव्हिएत इंटर – कोसमॉस स्पेस प्रोग्रामच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून, सप्टेंबर १९८२ साली माजी इंडियन एअर फोर्स पायलट असलेल्या राकेश यांची निवड करण्यात आली. भारताने सरकारने अशोक चक्र देऊन राकेश शर्मा यांचा गौरव केला आहे.
- Advertisement -
पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या आज जन्म दिवस. त्यांच्या जन्म १३ जानेवारी १९४९ साली झाला. ते मुळचे पंजाबच्या पटियाळी येथे राहणारे होते. राकेश शहरातील जुन्या शाळांपैकी एक असलेल्या सेंट जॉर्जेस ग्रॅमर स्कूलमध्ये शिकले आणि निजाम कॉलेजमधून पदवी अभ्यास पूर्ण केला.
१९६६ साली १८ वर्षांच्या वयातच त्यांनी भारतीय वायुसेनेमध्ये कॅडेट म्हणून प्रवेश मिळवला. १९७९ मध्ये ते टेस्ट पायलट बनले आणि १९७१ साली ते मिग फाइटर जेट्सवर पायलट होते. ते पाकिस्तान विरूद्ध लढाईत सहभागी होते.
इस्रो आणि सोव्हिएत इंटर – कोसमॉस स्पेस प्रोग्रामच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून, सप्टेंबर १९८२ साली माजी इंडियन एअर फोर्स पायलट असलेल्या राकेश यांची निवड करण्यात आली. ते कझाक सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिकमधील, बायकॉनूर कॉस्मोड्रोममधून, सोव्हिएत रॉकेट सोयझ टी – ११ मधून अंतराळात पोहोचलेले पाहिले भारतीय झाले. सोयझ टी – ११ मधून तीन सदस्यांची सोव्हिएत – भारतीय टीम, आंतरराष्ट्रीय सॅल्यूट (Salyut) 7 ह्या ऑर्बिटल स्टेशनवर पोहोचली. शर्मा यांनी ७ दिवस २१ तास आणि ४० मिनिटांचा कालावधी salyut7 ह्या स्टेशनवर अंतराळात घालवला.
वायुसेनेत पायलट असताना, भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) आणि सोव्हिएत इंटरकोसमॉस यांनी आयोजित केलेल्या स्पेस मिशनसाठी त्यांची निवड झाली होती. युरी मालिशेव आणि गॅनेडी स्ट्रेकालोव यांना स्पेस स्टेशनवर त्यांनी भारतीय भोजन बनवून दिले. राकेश ह्यांना रशियन चीझ केक खूप आवडत असे.
एप्रिल १९८४ रोजी कझाकिस्तानच्या बायकोनूर कॉस्मोड्रोममध्ये ही अंतराळ मोहीम सुरू झाली. मोहिमेहुन परत आल्यावर त्यांच्यावर अभिनंदन, शुभेच्छा आणि मेडल्सचा वर्षाव झाला होता. भारताने सरकारने अशोक चक्र देऊन राकेश शर्मा यांचा गौरव केला.