Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी ग्रहांचे गणित समजावणारा अवलिया गॅलिलिओ

ग्रहांचे गणित समजावणारा अवलिया गॅलिलिओ

गॅलिलिओ यांच्या प्रतिभाशाली बुद्धीचा आविष्कार खगोलशास्त्रापेक्षाही गणितशास्त्रात

Related Story

- Advertisement -

प्राचीन काळापासून मानवाला अंतराळातील खगोलांविषयी आकर्षण होते. दिवस, रात्र, ढगांचे भ्रमण, ता-यांचा भ्रमणमार्ग, सूर्योदय, चंद्रोदय यांचा संबंध तो मानवी जन्म मृत्यू, सकाळ, दुष्काळ यांच्याशी जोडू लागला. याच दरम्यान या ग्रह, ताऱ्यांचे विश्व एकूण गणितीय भाषेत माहिती देत एक नवा अविष्काराला मानवाला समजला. आणि या अविष्काराला जन्म देणारा अवलिया म्हणजे थोर गणितीय शास्त्रत्ज्ञ गॅलिलिओ. गॅलिलिओ यांचा जन्म 15 फेब्रुवारी, 1564 ला इटलीतल्या पिसा या शहरात झाला. त्यांचे वडील फ्लॉरेन्समधल्या एक उमराव घराण्यातले असले तरी आता गरिबीत राहत होते. ते गणितज्ज्ञ होते व संगीतशास्त्रावर त्यांचे लिखाण होते. नव्या नव्या युक्ती लढवत खेळण्यातली यंत्रे बनवणे हा गॅलिलिओ यांचा लहानपणाचा छंद. वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी पिसा विद्यापीठात प्रवेश घेतला. पण घरच्या गरिबीमुळे 1585 साली त्यांना हे शिक्षण सोडावे लागले. पुढच्या काळात पाण्याच्या स्तंभाच्या दाबाच्या तत्त्वावर चालणाऱ्या तराजूच्या शोधामुळे त्यांना प्रसिध्दी मिळाली. तसेच वेगवेगळ्या घन वस्तूंच्या गुरुत्वमध्यावरचा त्यांचा प्रबंध सर्वमान्य होऊन 1589 मध्ये पिसा विद्यापीठात गणिताचा अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यावेळी ते अवघे 25 वर्षांचे होते. तेथे शिकवत असतानाच त्यांनी अनेक प्रयोग करून गतिशास्त्राचा पहिला नियम स्थापित केला.

- Advertisement -

 

- Advertisement -