आज माहेरवाशीण गौराई आणि लाडक्या गणपती बाप्पाला भक्तांकडून भावपूर्ण निरोप देण्यात आला. गौरी-गणपतींसोबतच आज ५ दिवसांच्या बाप्पांचेही विसर्जन पार पडले. शहरातील सर्व प्रमुख चौपाट्यांवर भक्तांचा जनसागर लोटला होता. याचदरम्यान टिपलेली गिरगाव चौपाटीवरील विसर्जनाची काही दृष्यं...