घरफोटोगॅलरीगुगल सर्च इंजिन आणि बरंच काही....

गुगल सर्च इंजिन आणि बरंच काही….

Subscribe
आजच्या युगात आपण रोज काहीतरी सर्च करतच असतो. अशावेळी आपण गुगल वापरतो. पण गूगलशिवाय इतरसुद्धा सर्च इंजिन्स आहेत. ज्यांचा आपण वापर करू शकतो  आज आपण अजून काही सर्च इंजिनची माहिती घेऊ.
याहू-
याहू ही प्रमुख वेब सर्विस प्रोव्हायडर असून, सनिव्हेलमध्ये मुख्यालय आहे. व्हेरिझॉन कम्युनिकेशनच्या अंतर्गत ही कंपनी आहे. याहूची स्थापना जोनरी यंग आणि डेविड फिलो यांनी केली. गुगलवर याहूचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. याहू हे इंटरनेटच्या युगातील अग्रगण्य सर्च इंजिन होते. व्हेरिझॉन या कंपनीनी अधिकृतरित्या याहू 4.48 बिलियन डॉलरला विकत घेतले.
गूगल-
ऑनलाइन विश्वात अस्तित्त्वात असलेली प्रत्येक गोष्ट गुगलवरून शोधता येणे शक्य असले, तरी गुगलचे ‘बिझनेस मॉडेल’ आणि त्यांच्याकडून युजर्सच्या खासगीपणाविषयी केली जाणारी तडजोड हा अलीकडच्या काळामध्ये गंभीर मुद्दा बनतो आहे. त्यामुळेच, आपला खासगीपणा आणि ऑनलाइन सुरक्षिततेविषयी सजग असणाऱ्या युजर्सनी गुगलला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, सर्च इंजिनच्या सर्व गरजा पूर्ण करणारे काही चांगले पर्याय ऑनलाइन विश्वामध्ये उपलब्धही आहेत.
३ –
डक डक गो
मागील काही काळामध्ये ‘डकडकगो’ या सर्च इंजिनचा विस्तार वेगाने सुरू असून, युजरच्या प्रायव्हसीला या सर्च इंजिनने प्राधान्य दिले आहे. हे सर्च इंजिन ‘ओपन सोर्स’ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले असून, तुम्ही याद्वारे शोधलेली कोणतीही माहिती सर्च इंजिनकडून जमवली, साठवली आणि विकली जात नाही. ‘डकडकगो’ मध्ये एखादी गोष्ट शोधल्यावर मिळणारी उत्तरे ही ४०० व्यक्तिगत स्रोतांकडून मिळवलेली असतात. त्यातही तुम्हाला शोधासाठी पाने उलटणे पसंत नसेल, तर ‘डकडकगो’कडून एकाच पानावर सर्व उत्तरे पाहता येण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
४ –
बिंग-
बिंग’ हे गुगल खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे सर्च इंजिन असून, त्याची मालकी मायक्रोसॉफ्टकडे आहे. गुगलच्या तुलनेत बिंगचा वापर अद्याप खूपच मर्यादित असला, तरी ते वापरण्यास तितकेच सोपे आणि डोळ्यांना सुखावणारे आहे. माहितीच्या सुरक्षिततेबाबतीत मात्र ते गुगलपेक्षा सरस आहे का, याची कोणतीही माहिती मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलेली नाही.
५ –
यिप्पी-
यिप्पी हे सर्च इंजिन कार्नेजी मेलॉन युनिव्हर्सिटीमध्ये विकसित करण्यात आले आहे. एखादी गोष्ट शोधताना केवळ उपलब्ध पर्यायांपुरते मर्यादित न राहता खोलवर शोध घ्यायचा असेल, तर इतर सर्च इंजिनच्या तुलनेत ‘यिप्पी’ अधिक उपयुक्त ठरते. अन्य सर्च इंजिनद्वारे शोधणे कठीण असलेली पेजेस शोधण्यात ‘यिप्पी’ निपूण असून, त्याद्वारे तुम्ही मिळणारे पर्याय अधिकाधिक केंद्रित करू शकता.
6-
वुल्फ्राम अल्फा-
वुल्फ्राम अल्फा’ला केवळ सर्च इंजिन म्हणणे हे त्याच्याकडून देण्यात येणाऱ्या बहुविध सेवांवर अन्याय करणारे ठरेल. संगणकीय परिभाषेत ‘वुल्फ्राम अल्फा’ची ओळख ‘कंप्युटेशनल नॉलेज इंजिन’ अशी करून देण्यात येते. तुम्हाला पडलेल्या प्रश्नावर अचूक, स्पष्ट उत्तरे सुबक मांडणीमध्ये ‘वुल्फ्राम अल्फा’कडून सादर करण्यात येतात. ‘वुल्फ्राम अल्फा’मार्फत तुम्हाला जगभरातील वस्तुनिष्ठ बाबी आणि डाटा उपलब्ध होऊ शकतो आणि त्याची आकडेमोड करून विज्ञान, गणित यांसारख्या विविध विषयांवरील आवश्यक माहिती या इंजिनकडून मांडली जाते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -