Photo – मुंबई पुन्हा जलमय; नागरिकांची दैना!

गेल्या १२ तासांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत असल्याने जागोजागी पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. दादर, हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कलसह गोरेगाव, मालाड, कांदिवली, अंधेरी या भांगामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने होत होती. तर घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली.