Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Kapil Dev Special : भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू 

Kapil Dev Special : भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू 

कपिल देव यांनी १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले.

Related Story

- Advertisement -

भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांचा आज जन्मदिवस. कपिल देव यांची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होते. तसेच ते भारताचे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू मानले जातात. स्थानिक क्रिकेटमध्ये हरियाणाकडून दमदार कामगिरी केल्यावर कपिल देव यांची भारतीय संघात निवड झाली होती. १९७८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कपिल देव यांनी १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. कपिल देव यांनी १९९४ मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र, भारताला अजूनही त्यांची जागा घेऊ शकेल असा अष्टपैलू मिळालेला नाही.

- Advertisement -