लालबागच्या राजाच्या पहिल्या दर्शनासाठी लोटला जनसागर

लालबागच्या राजाचे पहिले दर्शन प्रसार माध्यमांमधून दाखवण्यात आले आहे. दरवर्षी लालबागच्या राजाचे मुखदर्शन गणेश चतुर्थीच्या आधी दिले जाते. यंदाही लालबागच्या राजाचे पहिले दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाचा देखावा भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ च्या कार्य कर्तुत्वाला सलाम करणारा साकारला आहे. नुकतेच इस्त्रोने अवकाशात सोडलेले ‘चांद्रयान २’ चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे. (सर्व छाया दिपक साळवी.)

Mumbai