‘या’ अभिनेत्रीचे बेबी बंप फोटोशूट झाले व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन हिने आपले अभिनय कौशल्य अनेक चित्रपटातून दाखवले आहे. तसेच ती एक चांगली मॉडेल आहे. एमटीव्ही वरील 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल' मध्ये ती परिक्षक होती. खूप दिवसांपासून ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. कारण ती गरोदर आहे. काही दिवसांपूर्वी तिने गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना सांगितली. लिसा ही सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. आता तिने बेबी बंपचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये लिसा काळ्या रंगाच्या बिकिनीत दिसत आहे. या फोटोमध्ये लिसाचा मुलगा तिच्या बेबी बंपला किस करताना देखील दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पहा लिसाचे हे व्हायरल झालेले बेबी बंपचे फोटो.....

Mumbai

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here