देशभरात मकर संक्रांतीला एक वेगळं महत्त्व आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा आणणारा हा सण देशात विविध पद्धतीने मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर मराठमोळ्या अभिनेत्रींनी पारंपारिक तसेच पाश्चिमात्य पेहरावात आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दिवसानिमित्त परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या पेहरावात तारकांचं सौंदर्य खुलले आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेंत्रीनी मकरसंक्रातीच्या निमित्ताने काळ्या रंगाला प्राधान्य देत आपले फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. हे सर्व फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)