डोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन

साडेसहा हजार कोटीचे पॅकेजची घोषणा, ग्रोथ सेंटरसाठी १०९० कोटी पाच हजार तरूणांना नोक-या मेट्रो ट्रेन २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका शीळ कल्याण एलिवेटेड रोड आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून साडे चारशे कोटीचे रस्ते मंजूर केल्याची घोषणा...राज्य सरकारकडून सर्वच घोषणाबाजी करण्यात आली असून प्रत्यक्षात एकही काम सुरू झालेले नाही. डोंबिवलीकर विविध समस्यांनी त्रस्त असून त्यांना केवळ आश्वासनाचे गाजर दाखवले जात आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी मनसेने डोंबिवली तीन हजार कोटीचे विमानतळाचे भूमीपुजन कार्यक्रम करून उपहासात्मक आंदोलन करीत सरकारच्या आश्वासनाची खिल्ली उडवली.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here