वृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली!

आरे मेट्रो कारशेडविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आला. शुक्रवारी शिवाजी पार्क येथील नाना-नानी पार्कमध्ये आरे मेट्रो कारशेड विरोधात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे 'रिद्धीमा नवनाथ करंदेकर' ही चौथीत शिकणारी मुलगी. या मुलीने वृक्ष किती महत्त्वाचे आहेत? हे समजून सांगण्याचा एक प्रयत्न केला.

Mumbai