Photo – ठाण्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई!

(छाया - गणेश कुरकुंडे)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कालच सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात आणि दुकानात देखील मास्क न घालणाऱ्यांवर ५०० रुपयाची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यातच आज महापालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी नऊ प्रभाग समिती अंतर्गत बाजारपेठा आणि दुकानांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता कुठेतरी सामन्यांना हा भुदंड सोसावा लागणार आहे. तर याबाबत आता तरी नागरिक सावधानतेने कारवाईच्या भीतीपोटी मास्क वापरतील अशी आशा आहे. (सर्व छाया – गणेश कुरकुंडे)