चक्क हिवाळ्यात नवी मुंबईत आंबे आले!

नवी मुंबईच्या, मुंबई कृषी उत्पन्न बाजार (एपीएमसी) समितीमध्ये साऊथ आफ्रिकामधून मालवी नावाचे आंबे दाखल झालेले आहेत. हा आंबा चवीला हापूस सारखा असून, तीन किलोच्या एका पेटीचा दर १५०० ते २००० रुपयात उपलब्ध आहे. गेल्या वर्षापासून हा आंबा भारतीय बाजारात आलेला आहे. ८ वर्षांपूर्वी कोकणातून हापूसची कलमे साऊथ आफ्रिकेत नेऊन तिथे लावण्यात आली होती. या झाडांचे आंबे नोव्हेंबर महिन्यात तयार होउन, खाण्यासाठी उपलब्ध होतात, या आंब्यांना मालवी आंबे म्हणतात. जहाजाद्वारे हे आंबे भारतात आणले जातात तर रोज या आब्यांच्या ५०० पेट्या मुंबईच्या बाजारात दाखल होणार आहेत. या आब्यांची पहिलीच पेटी आज मुंबईत दाखल झाली असून हा आंबा ग्राहकांना आवडलेला आहे असं तेथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Navi Mumbai