अजितदादा पवार यांचा बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अजितदादा पवार यांची भव्य निवडणूक रॅली काढण्यात आली.

Baramati