घरनवी मुंबईPhoto: बाणगंगा प्रदूषित करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावणार

Photo: बाणगंगा प्रदूषित करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावणार

Subscribe

या खोदकामामुळे बाणगंगेमध्ये येणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोतातून चिखल आणि चिखलमिश्रित पाणी कुंडामध्ये यायला लागले आहे.

वाळकेश्वर येथील प्रसिद्ध बाणगंगा तलावाच्या शेजारी बिल्डरकडून विकासकाम सुरू झाले आहे. त्यामुळे बाणगंगा जलस्रोत प्रदूषित झाली आहे. या खोदकामामुळे बाणगंगेमध्ये येणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोतातून चिखल आणि चिखलमिश्रित पाणी कुंडामध्ये यायला लागले आहे. संबंधित खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. बिल्डर जर रात्रीच्या वेळेस काम करत असेल तर महापालिका कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -