Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर फोटोगॅलरी Photo – मनसे नेते अविनाश जाधव यांना कार्यकर्त्यांचे समर्थन!

Photo – मनसे नेते अविनाश जाधव यांना कार्यकर्त्यांचे समर्थन!

मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना आज ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी हजारो मनसैनिकांनी ठाणे कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून घोषणाबाजी देखील केली. यावेळी अविनाश जाधव यांच्यावर पुष्प वर्षाव करत होते आणि समर्थनात घोषणाबाजी करून जर अविनाश जाधव यांची तडीपारीची नोटीस कॅन्सल झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा देखील मनसैनिकांनी यावेळी दिला. अविनाश जाधव यांना कोर्टात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सोमवारी पुन्हा एकदा जाधव यांना कोर्टात हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. (सर्व छाया - गणेश कुरकुंडे)

Thane