Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: ७ वर्षांनी श्रीसंतची 'क्रिकेट वापसी', खेळपट्टीला केला नमस्कार!

Photo: ७ वर्षांनी श्रीसंतची ‘क्रिकेट वापसी’, खेळपट्टीला केला नमस्कार!

श्रीसंतने २,८०४ दिवसांनतर खेळला पहिला व्यावसायिक सामना

Related Story

- Advertisement -

 

- Advertisement -

श्रीसंत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. श्रीसंत ११ जानेवारीला केरळच्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला आहे. तब्बल सात वर्षांहून जास्त काळानंतर श्रीसंतने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. सामना संपल्यानंतर श्रीसंतने खेळपट्टीला नमस्कार केला आहे. त्यामुळे श्रीसंतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २०१३ साली दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीसंतवर आयपीएलस सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. या बातमीने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या बातमीमुळे देशाच्या वेगवान गोलंदाजाची कारकीर्द धोक्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीसंतवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळण्यास दीर्घकालीन बंदी घातली होती. या बंदीमुळे श्रीसंत पुन्हा कधीही क्रिकेटमध्ये येऊ शकत नाही असे चाहत्यांना वाटत होते.

- Advertisement -