राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना सिनेसृष्टीतील कलाकारदेखील या उत्सवात दंग झाले आहेत. मराठी, हिंदी चित्रपटातील कलाकारांसह इतर सेलिब्रिटीदेखील बाप्पाच्या आगमनाने प्रफुल्लीत झाले आहेत. आपल्या घरामध्ये या सेलिब्रिटींनी गणरायाची प्रतिष्ठापना करून हा सण साजरा केला.