पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजारो लोकांसोबत योगासन

जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र यांनी आज रांची येथे ४० हजार लोकांसोबत योगा केला आहे. रांचीयेथील प्रभात तारा मैदानावर या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशातील प्रत्येक नागरिकांनी शरीर निरोगी ठेवण्यासाठी नेहमी योगा केला पाहिजे, या उद्देशाने स्वत: मोदींनी योगासन केली आहेत. अनेकदा पाहिले जाते नरेंद्र मोदी हे तरुणांना नेहमी निरोगी राहण्याचा सल्ला देत असतात. आज २१ जून रोजी 'जागतिक योग दिन' म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस भारतासह संपूर्ण जगात ५वा 'जागतिक योग दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर, जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दिल्लीत तब्बल ३०० ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Ranchi