ढोलताशांच्या गजरात एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे – ढोलताशांच्या गजरात, अपूर्व उत्साहात आणि शिवसैनिकांच्या जल्लोषात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुमारे दीड तास चाललेल्या या भव्य मिरवणुकीने किसननगर, वागळे इस्टेट परिसरात भगवा झंझावात निर्माण झाला होता. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’च्या डरकाळ्या आसमंतात घुमवत, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

Thane