शेतीचे नुकसान पाहणीसाठी उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना घाबरू नका नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शेतीच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर सध्या उद्धव ठाकरे आहेत. सांगली आणि सातारा जिल्हयातील नेवरी, विटा ,मायणी, कातर,पुसेगांव ,तरटगाव, लोणंद या गावात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी सवांद साधला.

Mumbai