सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ प्रदर्शित झाला असून चाहत्यांना सुशांतच्या हा चित्रपट पाहून अश्रू अनावर झाले आहेत. एकीकडे चाहत्यांमध्ये आपल्या फेवरेट स्टारचा शेवटचा चित्रपट पाहायला मिळाल्याचा आनंद देखील आहे आणि दुसरीकडे पुन्हा सुशांतला दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात पाहता येणार नाही याचे दुःख देखील आहे. दरम्यान आज आपण ‘दिल बेचारा’ या चित्रपटातील काही Best Scenes Photos पाहणार आहोत.
चित्रपटाच्या सुरुवातीलचा सुशांतला श्रद्धांजली वाहली आहे. या सीनने चाहत्यांना खूप रडवले आहे.
‘दिल बेचारा’ची सुरुवात कीजी बासू म्हणजे संजना संघी हिच्या कहाणीने झाली आहे. पण सुशांत सिंह राजपूतच्या एंट्रीने कीजीच्या आय़ुष्याला आणि दिल बेचारा चित्रपटाला रंग आला आहे. सुशांतची एंट्री या चित्रपट गमतीदारपणाने आहे.
‘दिल बेचारा’ या चित्रपटातील क्युट सीन पैकी हा एक सीन आहे. या सीनमध्ये सुशांत ‘चल झूठी’ बोलण्याचा अंदाज सगळ्यांच प्रेमात पाडेल असा आहे.
कीजी आणि मॅनी म्हणजे सुशांत या दोघांची दोस्ती झाल्यानंतर कीजी देखील मॅनीचा मित्र जगदीश पांडेसोबत चित्रपट बनवण्यासाठी तयार होते. त्यांच्या हा एक मजेदार क्षण आहे. दरम्यान मॅनीला सुपरस्टार रजनीकांत सोबत भोजपुरी चित्रपट बनवायचा असतो. त्या चित्रपटाचे नाव ‘रजनी आवत है, सपने जगावत है’ असे ठेवले असते.
हा चित्रपटातील सर्वात रोमँटिक सीन आहे. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा हा सीन आहे.
कीजी आणि मॅनीची मैत्री या चित्रपटात खूप मस्त दाखवली आहे. तसेच मॅनीचे बासू कुटुंबियांसोबत सुंदर नाते दाखवले आहे.
कीजीला कँन्सर असतो. अशा कठीण परिस्थितीत देखील मॅनी तिच्यासोबत असतो. कीजीची वाईट अवस्था पाहून मॅनी तिच्यापासून दूर राहू शकत नसतो. हा सीन इमोशनल सीन आहे.
यामध्ये पॅरीसमध्ये कीजी आणि मॅनी रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
चित्रपटात अनेक इमोशनल सीन आहे. त्यापैकी हा एक सीन असून हा सीन पाहणे खूप कठीण आहे. कीजी, मॅनी आणि जगदीशचा हा सीन खूप इमोशनल आहे. हा सीन पाहून अश्रू अनावर होतात.
चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये कीजीसाठी मॅनी दिलेला मेसेज दिलेला असतो. हा सीन पाहून चित्रपटातील पात्रांसह तुम्ही देखील रडायला लागला.