Photo – काळाचा घाला! झोपेत असतानाच कोसळली इमारत

भिवंडीतील पटेल कम्पाऊंड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली असून यामध्ये २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंतच्या बचावकार्यात २५ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले असून दहा जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ठाणे पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आली आहे. दरम्यान, एनडीआरएफच्या टीमने काहींना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढले आहे.