घरफोटोगॅलरीवर्ल्ड टूरसाठी जायचंय? मग इथे नक्की भेट द्या!

वर्ल्ड टूरसाठी जायचंय? मग इथे नक्की भेट द्या!

Subscribe

या ठिकाणी असते सर्वात जास्त पर्यटकांची गर्दी. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती ठिकाण

जगात अनेक सुंदर ठिकाणं आहेत. मात्र असे काही देश आहेत जिथे बहुतांश पर्यटक येण्यासाठी उत्सुक असतात. 

फ्रान्स

फ्रान्समध्ये फिरण्यासारखी असंख्य ठिकाणे आहेत. आयफेल टॉवरपासून ते डिझ्नेलॅन्ड पॅरिसपर्यंत अनेक सुंदर ठिकाणे आपण पाहू शकतो. दरवर्षी फ्रान्समध्ये अंदाजे ८ कोटी पर्यटक याला भेट देतात. अशीच सुंदर ठिकाणे पाहायची असल्यास फ्रान्सचा दौरा तुम्ही नक्की करु शकता.

- Advertisement -

अमेरिका

अमेरिका हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. अमेरिकेमधील न्यूयॉर्क, लास वेगास, लॉस एंजेलिस, फ्लोरिडा अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जेथे पर्यटक आनंद लुटू शकतात. या ठिकाणी दरवर्षी ७ कोटी पर्यटक येत असून या पर्यटकांध्ये भारतीयांची आकडेवारी अधिक आहे.

चीन

चीनची संस्कृती पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे पाच कोटी पर्यटक येत असतात. त्याचबरोबर चीनची भिंत ही जगभर प्रसिद्ध असल्यामुळे ती पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता असते.

- Advertisement -

इटली

इटलीमधील व्हेनिस असो किंवा रोम ही शहरे पर्यटकांना आकर्षित करत असतात. येथे वर्षभरात सुमारे पाच कोटी पर्यटक येतात.

तुर्की

तुर्कीमध्ये इस्‍तांबुल पासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत प्रत्येक ठिकाण ही विशेष आणि सुंदर आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या ठिकाणांना जास्त पर्यटक भेट देत असतात.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -