अनपेक्षित पावसाने मुंबईकरांना भिजवले!

भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. अशातच मुंबईच्या काही भागांत आज सकाळी पावसाने हजेरी लावली. मागील महिन्यात मुसळधार बरसल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा हजेरी लावली. ऐनवेळी पाऊस आल्याने मुंबईकरांची धांदल उडाली. अनेकांनी प्लास्टीकचा आधार घेत स्वतःला पावसात भिजण्यापासून वाचवले. तर काही जणांनी पावसात भिजतच आपली वाट काढली. सर्व छाया - दिपक साळवी

Mumbai