मोर्चे, आंदोलनं, निषेधांची मुंबईनगरी!

मुंबईत आज ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलनं, निषेधाच्या रॅली काढलेले चित्र पाहायला मिळाले. एकीकडे आझाद मैदानावर शिक्षकांनी आंदोलन केले तर दुसरीकडे अभ्यासक आनंद तेलतुंबडे यांच्या अटक वॉरंट विरोधी मोर्चा काढण्यात आला. राज्यातील दगडखाण कामगार व बेघर भिक्षुकांच्या प्रलंबित मागण्यासाठीही बेमुदत धरणे आंदोलन पाहायला मिळाले. तर पुलवामा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ दुकानं बंद पाडण्यात आली. सतत धावणाऱ्या या मुंबईला असाही थोडा ब्रेक मिळाला. (सर्व छाया - प्रवीण काजरोळकर)

Mumbai